इस्लामपूर : राजारामनगर (ता. वाळवा) येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘बाऊंड्रीच्या पलीकडे’ या एकांकिकेने कोल्हापूर विभागाच्या मानाच्या पुरुषोत्तम करंडकासह उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, अभिनय व उत्कृष्ट स्त्री अभिनेत्री अशा चार पुरस्कारांवर नाव कोरले. पुणे येथील महाराष्ट्रीय कलोपासक गायन समाज देवल क्लब आणि पुष्कराज जाधव फौंडेशन यांच्या विद्यमाने कोल्हापूर विभागाच्या पुरुषोत्तम करंडकासाठीच्या प्राथमिक फेरीत ‘राजारामबापू’च्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले. हा संघ पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत सहभागी होणार आहे, असे प्राचार्य आर. डी. सावंत यांनी सांगितले.सचिन तेंडूलकर याच्या जीवनावर आधारित ‘बाऊंड्रीच्या पलीकडे’ या एकांकिकेचा दिग्दर्शक व लेखक नंदकिशोर आटोळे याला सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखनासाठी पु. ल. देशपांडे करंडकासह उत्कृष्ट अभिनयाच्या ‘यशवंत दत्त’ करंडकाने गौरविण्यात आले. आईची भूमिका करणाऱ्या तेजस्विनी फरांदे हिने या स्पर्धेतील सलग दुसऱ्यावर्षी उत्कृष्ट स्त्री अभिनेत्रीसाठीच्या इंदिरा चिटणीस करंडकावर नाव कोरले. याच एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा ‘उमा शंकर’ करंडक प्रदान करण्यात आला.कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. आले. (वार्ताहर)
मानाच्या पुरुषोत्तम करंडकाला ‘आरआयटीयन्स’ची गवसणी
By admin | Updated: September 16, 2014 00:09 IST