आरआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ६ हजार डॉलरची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:14+5:302021-01-08T05:28:14+5:30

इस्लामपूर : ग्रामीण भागात दर्जेदार तंत्रशिक्षण देणाऱ्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील अद्ययावत सोयी-सुविधा बघून प्रभावित झालेल्या अमेरिकेतील सदर्ण विद्यापीठाचे ...

RIT students will receive a डॉलर 6,000 scholarship | आरआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ६ हजार डॉलरची शिष्यवृत्ती

आरआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ६ हजार डॉलरची शिष्यवृत्ती

इस्लामपूर : ग्रामीण भागात दर्जेदार तंत्रशिक्षण देणाऱ्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील अद्ययावत सोयी-सुविधा बघून प्रभावित झालेल्या अमेरिकेतील सदर्ण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बिजोइ साहू यांनी त्यांच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या आरआयटीमधील विद्यार्थ्यास प्रत्येक सेमिस्टरला ६ हजार डॉलरची शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले.

डॉ. साहू यांनी आरआयटी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. सचिव प्रा. आर. डी. सावंत व प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या जागतिक यादीत समावेश असलेल्या सदर्ण विद्यापीठाशी आरआयटीने शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत डॉ. साहू यांनी ही भेट दिली. आरआयटीमधील पायाभूत सुविधा, दर्जेदार शैक्षणिक सोयी, संशोधन आणि मार्गदर्शन अशा सर्व बाबींचे डॉ. साहू यांनी कौतुक केले. त्यानंतर त्यांनी मास्टर ऑफ सायन्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि एमबीए इन सप्लाय चेन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या उच्च शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती जाहीर केली. करारानुसार या दोन्ही संस्था भारत-अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी एकत्र सेमिनार घेणार आहेत. आरआयटीच्या ग्लोबल एज्युकेशन अँड एक्सपोजर सेलने या उपक्रमाचे संयोजन केले. डॉ. सचिन पाटील, डॉ. आनंद काकडे यांनी संशोधन कामाचे सादरीकरण केले. डॉ. अभिजित शहा यांनी आभार मानले.

फोटो : ०७ इस्लामपुर १

ओळ : इस्लामपूर येथील आरआयटी या स्वायत्त महाविद्यालयास अमेरिकेतील कुलगुरू डॉ. बिजोइ साहू यांनी भेट दिली. यावेळी प्रा. आर. डी. सावंत, प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

Web Title: RIT students will receive a डॉलर 6,000 scholarship