भाजीपाल्यांच्या दरातील वाढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST2021-04-19T04:23:34+5:302021-04-19T04:23:34+5:30

सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू केलेले कडक निर्बंध आणि आठवडा बाजारासह इतर सर्व व्यवहार बंद असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर या ...

Rising prices of vegetables continue | भाजीपाल्यांच्या दरातील वाढ कायम

भाजीपाल्यांच्या दरातील वाढ कायम

सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू केलेले कडक निर्बंध आणि आठवडा बाजारासह इतर सर्व व्यवहार बंद असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर या आठवड्यात पुन्हा वाढले आहेत. खाद्यतेलाची आवक पुन्हा एकदा घटल्याने या आठवड्यात पुन्हा दर वाढले आहेत.

कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी आठवडा बाजारासह इतर बाजारपेठ बंद आहे. यामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. फळभाज्यांच्या दरात पुन्हा वाढ होत प्रतिकिलो ८० रूपयांनी भाजी मिळत आहे.

चौकट

या आठवड्यात वांगी, दोडका, गवारी आदी भाज्या सरासरी ६० ते ८० रूपये प्रतिकिलोने मिळत आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. शेवग्यासह मेथी, पालक या भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजार बंद असले तरी घरोघरी जावून विक्रते भाज्यांची विक्री करत आहेत.

चौकट

तेलदराचा पुन्हा भडका

कडक निर्बंध आणि त्यामुळे वाहतुकीसह इतर नियमांमुळे किराणा सामानाच्या आवकेवर अडचणी येत आहेत. त्यात गेल्या महिनाभरापासून स्थिर असलेले खाद्यतेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. सुर्यफूल आणि सरकी तेलाची आवक ‌ वाढली आहे.

चौकट

कडक निर्बंधांमुळे लागू असलेल्या अत्यावश्यक सेवांमध्ये फळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही ग्राहकांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे आवक कमीच आहे. या आठवड्यात आंब्याची आवक वाढली आहे. कोकणातील आंब्याची आवक अद्यापही तुलनेने कमी आहे.

कोट

उन्हाळा वाढल्याने भाजीपाल्यांचे उत्पादन घटत चालले आहे. त्यात कोरोनामुळे बाहेरच्या मोठ्या बाजारपेठेतून मागणी वाढत असल्याने स्थानिक भाजीपाला कमी पडत आहे. या आठवड्यात दर पुन्हा वाढतील, असाच अंदाज आहे.

- सुभाष पाटील, भाजी विक्रेते

कोट

कडक निर्बंध असले तरी किराणा मालाची आवक होत आहे. मात्र, मागणीएवढी आवक होत नाही. परराज्यातून येणारा माल घटला आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा तेलाचे दर वाढले असले तरी गहू, तांदूळ, ज्वारीचे दर स्थिर आहेत.

- अनिल घोरपडे, व्यापारी

कोेट

आठवडा बाजार बंद असल्याने अडचणी येत आहेत. दारात येणाऱ्या भाजीपाल्याचे दर वाढीव आहेत. सगळे व्यवहार बंद असल्याने दर वाढल्याचे व्यापारी सांगतात. आता शासनानेच दर स्थिर ठेवून दिलासा द्यावा.

- कविता माने, गृहिणी

Web Title: Rising prices of vegetables continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.