भाजीपाला, किराणामालाच्या दरात पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:01+5:302021-02-15T04:23:01+5:30
सांगली : भाजीपाला, किराणा मालाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कांद्याचे दर वाढले असून, गेल्या आठवड्यापर्यंत सरासरी ६० ...

भाजीपाला, किराणामालाच्या दरात पुन्हा वाढ
सांगली : भाजीपाला, किराणा मालाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कांद्याचे दर वाढले असून, गेल्या आठवड्यापर्यंत सरासरी ६० रुपयांवर असणाऱ्या भाज्या ८० ते १०० रुपयांवर गेले आहेत.
वांगी, गवारी, दोडका दर वाढून सरासरी ८० ते १०० रुपयांवर पोहोचले आहेत. कांदा दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
इंधनाच्या दरातील वाढ ग्राहकांच्या मुळावर आली असून, किराणा मालाच्या दरातही वाढ झाली आहे. या आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
चौकट
गहू, खाद्यतेलाचे दर वाढले
गव्हाच्या दरात प्रतिकिलो २ ते ३ रुपयांची वाढ झाली आहे. यासह ज्वारी, बाजरीचेही दर वाढले आहेत. मसाल्याचे जिन्नसही महागल्याने ग्राहकांना सर्व बाजूंनी महागाईची झळ सोसावी लागत आहे.
चौकट
गृहिणींचे बजेट कोलमडले
सरासरी ४० रुपयांंना प्रतिकिलोने मिळणाऱ्या फळभाज्या आणि पाच रुपयांना मिळणारी पालेभाज्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाजीपाला दरातील वाढ यापुढे कायमच राहण्याची शक्यता आहे.
चौकट
कलिंगड दरात वाढ
फळ मार्केटमध्ये सफरचंद, संत्री, स्ट्रॉबेरीसह कलिंगडाची चांगली आवक झाली. केळीचे दर डझनाला दहा रुपयांनी वाढले आहेत. देशी केळीच्या दराही वाढ झाली असून, ५० ते ६० रुपये डझन दराने केळी मिळत आहेत.
कोट
बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या फळांच्या वाहतूकदरातच वाढ झाल्याने दरही वाढले आहेत. यापुढेही असेच दर वाढलेले असतील. सध्या दर्जेदार फळे बाजारात आलेली आहेत. दर वाढल्याने नाराजीही व्यक्त होत आहे.
सुनील करचे, फळविक्रेते
कोट
किराणा मालाच्या दरातील वाढ कायमच आहे. काही मालाची आवक अद्यापही मर्यादित असल्यानेही ही अडचणी येत आहेत. मात्र, दर स्थिर राहण्याऐवजी वाढतच असल्याने काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कविता माने, गृहिणी
कोट
नवीन धान्याची आवक सुरू होईपर्यंत दर वाढलेलेच असतील. सध्या नवीन तांदूळ उपलब्ध झाला आहे. जुना आणि नवीन तांदळाच्या दरात १० ते १५ रुपयांनी तफावत आहे. गहू, ज्वारीचे दर वाढले तरीही मागणी कायम आहे.
अनिरुद्ध गवाणे, व्यापारी