इंधन दरवाढीमुळे घर बांधकामाचाही खर्च वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:46+5:302021-06-16T04:34:46+5:30
पशू योजनांबाबत जनजागृती करा सांगली : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची ...

इंधन दरवाढीमुळे घर बांधकामाचाही खर्च वाढला
पशू योजनांबाबत जनजागृती करा
सांगली : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने त्यांच्याकडील योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत दिली पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी केली आहे.
आटपाडी ते सांगली मार्गावर बसेस वाढवा
सांगली : जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे आटपाडी ते सांगली मार्गावर एसटी महामंडळाने बसेस पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. आटपाडी तालुक्यातील अनेक लोक व्यवसायानिमित्त सांगली शहरात आहेत. यामुळे आटपाडी ते सांगली नियमित प्रवाशी करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्याने बसफेऱ्या वाढविण्याची गरज आहे.
लघू व्यावसायिक आर्थिक संकटात
सांगली : शहरात शेकडो लघू व्यावसायिक अनेक वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंब चालवत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे या वर्षी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लघू व्यवसाय करणाऱ्यांची दैनंदिन आवक रोजच्या आर्थिक घडामोडींवर अवलंबून असते. मात्र, कोरोनामुळे सर्व व्यवहार डबघाईस आल्यामुळे शासनाने लघू व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी व्यापारी संघटनांची आहे.
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सांगली : सांगली, मिरज शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने, मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. काही मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.