साखरेच्या दरात सत्ताधाऱ्यांकडून गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST2021-04-23T04:28:50+5:302021-04-23T04:28:50+5:30

रेठरेधरण, ता. वाळवा येथे कृष्णा कारखान्याच्या सभासदांची बैठक झाली. यावेळी अविनाश माेहिते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सभासदांना जर ...

Rise in sugar prices by the authorities | साखरेच्या दरात सत्ताधाऱ्यांकडून गोलमाल

साखरेच्या दरात सत्ताधाऱ्यांकडून गोलमाल

रेठरेधरण, ता. वाळवा येथे कृष्णा कारखान्याच्या सभासदांची बैठक झाली. यावेळी अविनाश माेहिते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सभासदांना जर कृष्णा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवायचा असेल तर संस्थापक पॅनेलला सहकार्य केले पाहिजे. आमची सत्ता आल्यास सभासदांना गटावर मोफत साखर दिली जाईल. एफआरपीपेक्षा जादा दर शेतकऱ्यांना देण्यात येईल. कारखान्यातील कामगारांना १२.५० टक्केपेक्षा अधिक बोनस व मागील काळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

अमोल पाटील-दादा युवाशक्ती रेठरे धरण यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. यावेळी सुहास पाटील, अमोल पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, जयेश मोहिते, विक्रम पाटील, संभाजी खंडागळे, धोंडीराम पाटील, जयवंत पाटील, अधिक पाटील, सी. बी. पाटील, तानाजी पाटील, सुनील देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Rise in sugar prices by the authorities