जतमध्ये मराठा आरक्षणासाठी रिपाईचे प्रशासनास निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:47+5:302021-06-10T04:18:47+5:30
संख : मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष संजय कांबळे ...

जतमध्ये मराठा आरक्षणासाठी रिपाईचे प्रशासनास निवेदन
संख : मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांना दिले. याप्रश्नी लॉकडाऊन उठल्यानंतर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे. सध्या काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. औषधे तपासणी शासनाच्या दरात मिळावेत. ग्रामीण भागातील लोकांना ऑनलाईन बुकिंग अवगत नाही. शासनस्तरावरील निर्णय घेऊन लसीकरण घरोघरी करावे. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंगरोड बायपास रस्ता करावा. विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गाची प्रस्तावित २४ मीटर रुंदी का कमी केली याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी. यासह विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, किशोर चव्हाण, विनोद कांबळे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुभाष कांबळे, तालुका सरचिटणीस प्रशांत ऐदाळे, शहराध्यक्ष संजय कांबळे, तालुका उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे, मातंग आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुनील गुळे, लोहगावचे ग्रामपंचायत सदस्य दीपक मागाडे आदी उपस्थित होते.
फोटो : ०९ संख १
ओळ : जत येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांना विविध मागण्यांबाबत निवेदन दिले.