जिल्ह्यात रिपाइं तीस हजार सभासदांची नाेंदणी करणार : संजय कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST2021-01-08T05:32:04+5:302021-01-08T05:32:04+5:30

माडग्याळ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे येथे पार पडली. यावेळी ...

RIPAI will register 30,000 members in the district: Sanjay Kamble | जिल्ह्यात रिपाइं तीस हजार सभासदांची नाेंदणी करणार : संजय कांबळे

जिल्ह्यात रिपाइं तीस हजार सभासदांची नाेंदणी करणार : संजय कांबळे

माडग्याळ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे येथे पार पडली. यावेळी सांगली जिल्हयातून सुमारे तीस हजार सभासदांची नोंदणी करण्याचा निर्धार सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी व्यक्त केला.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामभाऊ सरवदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, युवक आघाडीचे पश्चिम महाराषट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय नोंदणीकृत पक्ष म्हणून आपल्या पक्षाला नोंदणीकृत निवडणूक चिन्ह मिळेल. पक्ष वाढीकरिता सदस्य नोंदणी कार्यक्रम राबवून सर्व जाती-धर्मातील जनतेला रिपब्लिकन पक्षाचा नोंदणीकृत सदस्य करणे महत्त्वाचे आहे. यापुढे निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.

यावेळी सांगली जिल्हा सरचिटणीस सचिन जाधव, सतीष माळगे, बापू सोनवणे, सुमित कांबळे, अविराज काळबेग यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: RIPAI will register 30,000 members in the district: Sanjay Kamble