शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर, नामंजूरच्या घोषणांनी गाजली सांगली शिक्षक बँकेची सभा, नफा वाटणीवरून गदारोळ

By शीतल पाटील | Updated: September 26, 2022 16:18 IST

सांगली : दोन महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या संचालकांनी विरोधकांची कोंडी करीत शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळाची परंपरा खंडीत ...

सांगली : दोन महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या संचालकांनी विरोधकांची कोंडी करीत शिक्षकबँकेच्या सभेत गोंधळाची परंपरा खंडीत केली. नफा वाटणीवरून विरोधक आक्रमक होते. सभागृहात निषेधाचे फलकही झळकविले. त्यांच्या विरोधाची दखल न घेताच सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावर सर्व विषय आवाजी मतांनी मंजूर केले. मंजूर-ना मंजूरच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सभा माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्षा अनिता काटे, संचालकांसह बँकेचे अधिकारी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने सभेस सुरवात झाली. अमोल शिंदे यांनी स्वागत केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले.त्यानंतर अध्यक्ष विनायक शिंदे यांनी माईकचा ताबा घेत अजेंड्यावरील विषयांचे वाचन करीत निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक विषयाला उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट व विजयाच्या घोषणा देत मंजुरी दिली.नफा वाटणीवरून विरोधकांनी रान उठविले होते. पण या मुद्दावर विरोधकांच्या कारभारावर ताशेरे ओढत कोंडी केली. बँकेला इमारत, जागा, फर्निचर, संगणक व सॉप्टवेअर खरेदी यासाठी लागणार्या भांडवली गुंतवणुकीस मंजुरी देण्यात आली. यावेळी मंजूर-नामंजूरच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. उपाध्यक्षा अनिता काटे यांनी आभार मानले.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकbankबँक