शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास

By घनशाम नवाथे | Updated: April 29, 2024 17:43 IST

सांगली : सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी आसित रमजान मुजावर (वय २२, रा. रूक्मिणी मार्केट, ...

सांगली : सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी आसित रमजान मुजावर (वय २२, रा. रूक्मिणी मार्केट, वानलेसवाडी, ता. मिरज) याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी खटला चालवला.अधिक माहिती अशी, विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी हरवली होती. आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात ९ सप्टेंबर २०१९ रोजी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी पिडितेचा शोध सुरू केला. तेव्हा ती सांगलीत एकेठिकाणी आढळली. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा पिडितेने आरोपी आसीत याने पुण्याजवळील नारायणगाव येथे एका घरी नेऊन तिथे इच्छेविरूद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचे सांगितले. यानंतर पिडितेच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी आसीत याच्याविरूद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. घटनास्थळाचा पंचनामा, पिडिता व तिच्या आईचा जबाब नोंदवला. इतर तपास टिपणे नोंदवून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे या खटल्यात ९ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी शिक्षेच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद केला. आरोपी आसीत याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. कोणतीही सहानुभूती दाखवू नये तसेच दंडाची रक्कम पिडितेला द्यावी अशी विनंती केली.न्यायाधीश हातरोटे यांनी आरोपी आसीत याला दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजात पोलिस कर्मचारी सनी मोहिते, इम्रान महालकरी, पैरवी कक्षातील सुनिता आवळे, रेखा खोत आदींचे सहकार्य मिळाले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय