सांगलीत रिक्षा रुग्णवाहिकेची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:09+5:302021-05-14T04:26:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली जिल्हा रिक्षा चालक, मालक संघटना व स्पंदन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांसाठी रिक्षा ...

सांगलीत रिक्षा रुग्णवाहिकेची सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली जिल्हा रिक्षा चालक, मालक संघटना व स्पंदन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांसाठी रिक्षा रुग्णवाहिका तयार केली आहे. माफक दरात ती उपलब्ध करून देण्यात येणार असून, सेवेचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला.
सांगलीचे प्रादेशिक परिवहन निरीक्षक अभिजित पोटे यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व यंत्रणेवर ताण पडत आहे. रुग्णवाहिकाही कमी पडत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन संघटनेने जो धाडसी निर्णय घेतला आहे, तो कौतुकास्पद आहे. याचा रुग्णाला लाभ होईल. यावेळी पै. पृथ्वीराज पवार स्पंदनचे अध्यक्ष मिर्झा, आर. बी. शिंदे साहेब यांच्या हस्ते रिक्षा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. महादेव पवार व रामभाऊ पाटील यांनी आभार मानले. यावेळी आसिफ बावा, प्रशांत भोसले, आनंद देसाई, सतीश साखळकर, उदय मुळे, अभिमन्यू भोसले, रवींद्र वादवणे, शुभम चव्हाण, सुशांत भोसले, आदी उपस्थित होते.