शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यात अवकाळी पावसाने भात पिकास खोडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:37 IST

शिराळा तालुक्यात यावर्षी पावसाने उच्चांक नोंदवला. ऊस पिकाबरोबरच भात या खरीप पिकाची अपरिमित हानी झाली. अवकाळीने उरल्यासुरल्या धान्याची नासाडी झाली. भातापासून वैरण म्हणून मिळणारे पिंजर वाया गेले. शेतकºयांना दुहेरी फटका बसला

ठळक मुद्देदुबार भातास लोंब्या : भातासह वैरण शेतक-यांच्या पदरात पडणार

सहदेव खोत  ।पुनवत : शिराळा तालुक्यात यंदा अति पावसाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. खरीप हंगामात हानी झालेल्या भात पिकाच्या कापणीनंतर शेतातील ओलीमुळे भात पिकाचे खोडवे आलेले पाहावयास मिळत आहे. या दुबार भाताला लोंब्याही आल्या आहेत. त्यामुळे भाताबरोबरच वैरणही शेतकºयांच्या पदरात पडणार आहे. परंतु पावसाने झालेले नुकसान भरून येणार नाही.

शिराळा तालुक्यात यावर्षी पावसाने उच्चांक नोंदवला. ऊस पिकाबरोबरच भात या खरीप पिकाची अपरिमित हानी झाली. अवकाळीने उरल्यासुरल्या धान्याची नासाडी झाली. भातापासून वैरण म्हणून मिळणारे पिंजर वाया गेले. शेतकºयांना दुहेरी फटका बसला. नोव्हेंबर उजाडेपर्यंत पाऊस पडल्याने काढणी करणे अवघड झाले. काढणीनंतर शेतात ओल कायम राहिल्याने अनेक ठिकाणच्या भातवाफ्यात खोडवा पीक उगवून आले आहे. रब्बी हंगाम लांबणीवर पडल्याने अनेक शेतक-यांनी भाताचे खोडवे तसेच राखले आहेत. भात आणि पिंजर फायद्यात पडेल म्हणून काहींनी खताची मात्रा दिली आहे.

अनेक ठिकाणी खोडवा भात नजरेस पडत आहे. दुबार पीक पोसवले आहे. त्यामुळे अशा शेतात काही तरी पदरात पडेल, अशी शेतकºयांना आशा आहे. परंतु अवकाळी पावसाने झालेले नुकसान भरून येणार नाही. त्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे.

रब्बी हंगामात साधारण नोव्हेंबरच्या मध्यावर गहू, मका या पिकांची पेरणी होते. पेरणी वेळेत झाली तर ही पिके साधतात. पण यंदा हा काळ पुढे गेल्याने ही पिके आता यापुढे कितपत फायदेशीर ठरणार, ही चिंता सतावू लागली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस