म्हैैसाळ योजनेचे आवर्तन सुरू; पाणी जतला सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:58 IST2018-10-21T23:57:55+5:302018-10-21T23:58:02+5:30
मिरज : म्हैसाळ योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याने ‘म्हैसाळ’चे पोटकालवे अद्याप बंदच आहेत. आरग येथील शेतकºयांनी ...

म्हैैसाळ योजनेचे आवर्तन सुरू; पाणी जतला सोडले
मिरज : म्हैसाळ योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याने ‘म्हैसाळ’चे पोटकालवे अद्याप बंदच आहेत. आरग येथील शेतकºयांनी खा. संजय पाटील यांची भेट घेऊन लक्ष्मीवाडी पोटकालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली. म्हैसाळच्या पाचव्या टप्प्यातून जतला पाणी सोडण्यात आले आहे.
अपुºया पावसामुळे पाणीटंचाई जाणवू लागल्याने म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायती क्षेत्र अवलंबून असलेले शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते. सप्टेंबर महिन्यात ताकारी, टेंभू व म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. खंडित वीजपुरवठा सुरू झाल्यानंतरही म्हैसाळ योजनेच्या २० हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पाण्याची मागणी नोंदविण्याच्या प्रतीक्षेत आवर्तन रखडले होते. पहिल्या टप्प्यातील १४, दुसºया टप्प्यात १७, तिसºया टप्प्यात १२, चौथ्या टप्प्यात १० व पाचव्या टप्प्यातील ५ पंपांद्वारे मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत असून, सोमवारी पाणी जतपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हैसाळच्या मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची मागणी नोंदवून पैसे भरणाºया शेतकºयांसाठी डोंगरवाडी, गव्हाण व लिंगनूर पोटकालवे सुरू करण्यात आले आहेत. आरग ते लक्ष्मीवाडी पोटकालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आरगच्या शेतकºयांनी वारणाली येथे खा. संजय पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी व म्हैसाळच्या अधिकाºयांची बैठक घेऊन खा. संजय पाटील यांनी, शेतकºयांना पाणीपट्टीची रक्कम भरण्याचे आवाहन केले.
दहा लाख भरले!
डोंगरवाडी, गव्हाण व लिंगनूर पोटकालव्यांच्या क्षेत्रातील शेतकºयांनी सुमारे १० लाख रूपये पाणीपट्टी भरली आहे. प्रति १० हजार लिटर पाण्यासाठी केवळ ७ रूपये आकारणी करण्यात येत असल्याने शेतकºयांनी पाणीपट्टी भरल्यानंतरच पोटकालवे सुरू करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले.