शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्याबाबत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST2021-03-16T04:28:24+5:302021-03-16T04:28:24+5:30
शिराळा : येथील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज पुतळा व स्मारक उभारणी आदी कामांबाबतच्या विकास आराखड्यावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित ...

शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्याबाबत आढावा बैठक
शिराळा
: येथील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज पुतळा व स्मारक उभारणी आदी कामांबाबतच्या विकास आराखड्यावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत किल्ल्यावर सुशोभिकरण करणे, शौर्य वाडा उभारणे व त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शिल्पचित्र घटनाक्रम तयार करणे, या वाड्याबाहेर संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे हे मुद्दे चर्चेत होते. यावेळी वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी तयार केलेल्या विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. आवश्यक बदल सुचविण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम,
जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव,
कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर, उपअभियंता अतुल केकरे, उपनगराध्यक्ष विजय दळवी, नगरपंचायत मुख्याधिकारी योगेश पाटील, राजेंद्र निकम, बसवेश्वर शेटे आदी उपस्थित होते.