नरवाडमध्ये काेराेना उपायांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:26 IST2021-05-10T04:26:21+5:302021-05-10T04:26:21+5:30
आजवर गावात ९३ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले असून यांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, याची गांभीर्याने दखल ...

नरवाडमध्ये काेराेना उपायांचा आढावा
आजवर गावात ९३ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले असून यांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषद अध्यक्षा कोरे यांनी गावचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मुंडगणूर, मिरज पंचायत समिती सदस्या सुमन भंडारे, नोडल अधिकारी शीतल उपाध्ये, वैद्यकीय अधिकारी नंदकुमार खंदारे, कृषी साहाय्यक राजू रजपूत उपस्थित होते.
गावच्या समस्या भाजप तालुकाध्यक्ष शंकर शिंदे यांनी मांडल्या. यावेळी सरपंच राणी नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य मारुती जमादार, महेश डुबल, अजित हेगडे, ग्रामसेविका उज्ज्वला आवळे, पोलीस पाटील दीपक कांबळे, अंगणवाडी कर्मचारी महिला, आदी उपस्थित होत्या.