शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Sangli News: महसूलच्या अधिकाऱ्यांना ट्रक मालकाकडून मारहाण, अधिकारी कोण?; जोरदार चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:20 IST

‘मी जातो. मात्र, पोलिसांना कळवू नका.’ असे म्हणत केला पोबारा

कोकरूड : बांधकामासाठी चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी करायला आलेल्या महसूलच्या विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना ट्रकवर कारवाई न करता ट्रक मालकाचा पाठीवर प्रसाद घेत माफी मागण्याची वेळ आली. या प्रकाराची चर्चा शिराळा तालुक्यासह कराड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. हे अधिकारी कोण? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.शनिवार, दि. २८ रोजी कराड तालुक्यातील चिरा वाहतूक करणारा ट्रक रात्री साडेआठच्या सुमारास शेडगेवाडीहून कराडकडे निघला होता. यावेळी महसूल विभागाचे मंडल अधिकारी, दोन तलाठी रात्रीच्या गस्तीवर होते. या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत ट्रक सांगली जिल्ह्याच्या हद्दीजवळ पकडून येळापूर परिसरात आणला. मालाची पावती खरी की खोटी पाहण्यासाठी तीन तास ट्रक रोखून धरल्याने चालकाने ही माहिती मालकाच्या कानी घातली. काही वेळाने कराड तालुक्यातून आलेल्या ट्रक मालक व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी या अधिकाऱ्याकडे ओळखपत्राची मागणी करत ट्रक का अडविला, याची विचारणा केली असता मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांना ओळखपत्र अथवा महसूल विभागात असल्याचा पुरावा दाखवता आला नाही. यामुळे गाडी मालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिघांना बदडून काढले. रात्री साडेआकराच्या सुमारास माराच्या एक जण येळापूर गावात शिरला. ‘वाचवा वाचवा’ अशी आरडाओरड ऐकुन घराबाहेर आलेल्या काही लोकांनी ‘तुम्ही पोलिसांना फोन करा. गावात शिरू नका. चोर समजून आणखी मार खाल, असा सल्ला दिल्यानंतर ‘मी जातो. मात्र, पोलिसांना कळवू नका.’ असे म्हणत त्याने पाठीमागून  आलेल्या चारचाकीमधून पोबारा केला. 

टॅग्स :Sangliसांगली