बेवनुरात अवैध दगड उत्खननाकडे महसूलचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:09+5:302021-08-13T04:30:09+5:30

१२बेवनूर०१ : बेवनूर (ता. जत) येथे अवैध गौण खनिज उत्खनन बंद करावे, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे ...

Revenue neglect of illegal stone quarrying in Bevanur | बेवनुरात अवैध दगड उत्खननाकडे महसूलचे दुर्लक्ष

बेवनुरात अवैध दगड उत्खननाकडे महसूलचे दुर्लक्ष

१२बेवनूर०१ : बेवनूर (ता. जत) येथे अवैध गौण खनिज उत्खनन बंद करावे, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे दिले. यावेळी श्रेयश नाईक, बापूसो शिंदे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : बेवनूर (ता. जत) येथे महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे डी. बी. एल. कंपनीने दगड उत्खनन सुरू केले आहे. सहा मीटर उत्खननाचा परवाना असताना ३० मीटरपर्यंत उत्खनन केले आहे. खनिकर्म विभागाकडून २५ हजार ब्रासचा उत्खनन परवाना असताना जादा उत्खनन केले आहे. अवैध गौण खनिज उत्खनन बंद करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थांनी केली आहे.

बेवनूर येथे दिलीप बिल्डकॉन कंपनीने गावापासून तीन कि.मी अंतरावरील कळवाल येथील नऊ एकर १० गुंठे जमीन शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. जुनोनी येथे कंपनीचे स्टोन क्रशर आहे. त्याला खाणीतून दगड पुरविला जातो. दगडी खाणजवळ लोकवस्ती आहे. खाणीतून बोअर ब्लास्टगच्या साहाय्याने दगड काढतेवेळी बाहेर दगड पडतात. बाहेर पडणाऱ्या दगडाने परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. उत्खनन क्षेत्राभोवती निकृष्ट दर्जाचे संरक्षित कंपाउंड घातले आहे. त्यामुळे लोकवस्तीचे नुकसान झाले आहे. चांगल्या दर्जाचे लोखंडी जाळीचे कंपाउंडाचे बांधकाम करावे. लोकवस्तीमध्ये दगड येणार नाहीत म्हणून जबाबदार कर्मचाऱ्याकडून लेखी हमी प्रमाणपत्र मिळावे. उत्खनन क्षेत्राशेजारी सेफ झोन सोडला नाही. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचे सेफ झोन मापन जमीन खरेदी करून घेण्यात आलेले नाही. सेेफ झोन मापन करून नुकसान टाळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सहा मीटरपर्यंत उत्खननाचा परवाना असताना ३० मीटरपर्यंत उत्खनन केलेले आहे. खनिकर्म विभागाकडून २५ हजार ब्रास उत्खनन परवाना असताना जादा उत्खनन केले आहे. २०१८ पासून गौण खनिज उत्खनन सुरू आहे. ते बंद करावे. आजअखेर बेकायदेशीर उत्खननाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून पंचनामा करावा. जादा उत्खननाची कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

कोट

महसूल प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे गौण खनिज उत्खनन क्षेत्रासमोर सोशल डिस्टन्सचे पालन करून संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवारी, दि. १३ रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांना दिला आहे.

-श्रेयश नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.

Web Title: Revenue neglect of illegal stone quarrying in Bevanur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.