कोविड उपचारासाठी जादा आकारलेले सव्वालाख रुपये परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:09+5:302021-06-10T04:19:09+5:30
मिरज : कोविड रुग्णाच्या उपचारासाठी जादा आकारण्यात आलेले १ लाख २३ हजार रुपये मिरजेतील ॲपेक्स व कुपवाड येथील ...

कोविड उपचारासाठी जादा आकारलेले सव्वालाख रुपये परत
मिरज : कोविड रुग्णाच्या उपचारासाठी जादा आकारण्यात आलेले १ लाख २३ हजार रुपये मिरजेतील ॲपेक्स व कुपवाड येथील संजीवनी हाॅस्पिटल व्यवस्थापनाने संबंधित दोन रुग्णांना परत दिले. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी बिलाची जादा घेतलेली रक्कम परत न दिल्यास कारवाईचा इशारा दिल्यानंतर रुग्णांना ही रक्कम परत देण्यात आली.
मिरजेतील ॲपेक्स व कुपवाड येथील संजीवनी हाॅस्पिटलमध्ये सांगली व कानडवाडी येथील दोन रुग्णांनी उपचारासाठी जादा बिल आकारणी केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित हॉस्पिटलने जादा दराने केलेल्या आकारणीची महापालिका अधिकाऱ्यांकडून चाैकशी करण्यात आली. नि:शुल्क तपासण्यासाठी प्रयोगशाळा शुल्क व नि:शुल्क औषधांसाठी आकारणी केल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले. याबाबत ॲपेक्स व संजीवनी हाॅस्पिटलला जादा घेतलेले उपचाराचे बिल परत द्यावे. जादा आकारणी केलेली रक्कम रुग्णांना सात दिवसात परत न दिल्यास कारवाई करण्याची नोटीस उपायुक्त स्मृती पाटील यांनी बजावली हाेती. त्यानुसार ॲपेक्स हाॅस्पिटलने सांगली येथील रुग्णाला ५७ हजार ९४० रुपये व संजीवनी हाॅस्पिटलने कानडवाडी येथील रुग्णाला ६५ हजार रुपये परत दिले.