इस्लामपुरात ५७ लाभार्थ्यांना सेवानिवृत्ती वेतन पत्र प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:36+5:302021-03-31T04:27:36+5:30
संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन मंजुरी पत्राचे वाटप करताना प्रा. शामराव पाटील, शहाजी पाटील, संजय पाटील, रोझा किणीकर आदी. ...

इस्लामपुरात ५७ लाभार्थ्यांना सेवानिवृत्ती वेतन पत्र प्रदान
संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन मंजुरी पत्राचे वाटप करताना प्रा. शामराव पाटील, शहाजी पाटील, संजय पाटील, रोझा किणीकर आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जयंत दारिद्र्य निर्मूलनमार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ व वृध्दापकाळ योजनेंतर्गत ५७ लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. यावेळी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील, शहर अध्यक्ष शहाजी पाटील, प्रदेश प्रतिनिधी कमलताई पाटील, महिला अध्यक्ष रोझा किणीकर, उपाध्यक्ष मालन वाकळे, पुष्पलता खरात, शहर युवती अध्यक्ष प्रियंका साळुंखे, शहर युवा युवक अध्यक्ष सचिन कोळी, सामाजिक न्याय विधीचे अध्यक्ष गोपाल नागे, ओबीसी सेलचे अध्यक्ष शकील जमादार, भटक्या विमुक्त जातीचे अध्यक्ष मोहन भिंगार्डे, शहर संघटक सागर जाधव, योगिता जाधव, सुवर्णा जगताप, प्रतिभा पाटील, उषा जावळे, रणजित तेवरे, दिग्विजय पाटील, राजाराम जाधव, विनायक जगताप यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग ३ मधील बूथ अध्यक्ष राहुल नागे यांनी केले.