वहिदा पट्टेकरी यांचा निवृत्ती समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST2020-12-30T04:35:41+5:302020-12-30T04:35:41+5:30
बागणी : काकाचीवाडी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा पट्टेकरी यांचा निवृत्ती समारंभ झाला. यावेळी पट्टेकरी यांनी ...

वहिदा पट्टेकरी यांचा निवृत्ती समारंभ
बागणी : काकाचीवाडी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा पट्टेकरी यांचा निवृत्ती समारंभ झाला.
यावेळी पट्टेकरी यांनी शाळेस लॅपटॉप, प्रिंटर व विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य भेट दिले. पट्टेकरी व त्यांचे पती आदम पट्टेकरी यांचा सत्कार ग्रामपंचायत व शाळेकडून करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख नजमा पिरजादे, काकाचीवाडीचे सरपंच प्रमोद माने, उपसरपंच सुवर्णा माळी, ग्रामसेविका सुरेखा माने, तलाठी बी. टी. गुरव, भीमराव खुडे, विकास सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी ढोले, दीपक कोडग, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप कोळी उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले, सावित्री मालेकर यांनी आभार मानले.
फोटो : २९१२२०२०-आयएसएलएम बागणी न्यूज
ओळ : काकाचीवाडी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळेस पट्टेकरी कुटुंबीयांनी केंद्रप्रमुख नजमा पिरजादे, सरपंच प्रमोद माने, उपसरपंच सुवर्णा माळी, भीमराव खुडे यांच्याकडे लॅपटॉप, प्रिंटर भेट दिला.