सेवानिवृत्त शिक्षकाला ऑनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:20+5:302021-01-08T05:29:20+5:30

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाची फसवणूक करण्यात आली. एटीएममधून पैसे काढताना त्यांच्या ...

Retired teacher online gangster | सेवानिवृत्त शिक्षकाला ऑनलाईन गंडा

सेवानिवृत्त शिक्षकाला ऑनलाईन गंडा

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाची फसवणूक करण्यात आली. एटीएममधून पैसे काढताना त्यांच्या मागेपुढे असलेल्या तिघांनी २१ हजार ७०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी नामदेव हरी माळी (वय ७४, रा. कुपवाड रोड, कवलापूर) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २२ डिसेंबर रोजी माळी हे बुधगाव येथील एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते.

पैसे काढण्यासाठी ते उभे राहिले असताना त्यांच्या मागेपुढे उभे राहिलेल्या तिघांनी चलाखी करत २० हजार रुपये एटीएमव्दारेू तर ऑनलाईन पध्दतीने १७०० रुपये काढून घेतले. नावात अदलाबदल करून एटीएमव्दारे पैसे काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. अज्ञाताविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Retired teacher online gangster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.