शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत निवृत्त शिक्षकाला दीड कोटीचा गंडा, सहा जणांवर गुन्हा दाखल 

By शीतल पाटील | Updated: October 25, 2023 15:47 IST

सांगली : जादा परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाला तब्बल १ कोटी ४६ लाख ७६ हजार ९०२ रुपयांचा ...

सांगली : जादा परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाला तब्बल १ कोटी ४६ लाख ७६ हजार ९०२ रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना २१ मे ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नरेश शंकर जोशी ( रा. विश्रामबाग, सांगली ), राहुल बाळासाहेब चव्हाण (रा. लक्ष्मी छाया डेंटल नजीक, प्रांत कार्यालयाजवळ, किल्ला भाग, मिरज ), सौरभ ओमप्रकाश शर्मा (रा. कट्टारी मराका मोहल्ला, पंखा जोतवारा, जयपूर, राजस्थान ), राजेंद्र शशिकांत खांडेकर ( रा. इंदोर, मध्यप्रदेश ), जमीर अली (रा. जयपूर, राजस्थान ), अजित जयपाल पाटील (रा. मिरज बोलवाड रस्ता, टाकळी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. आयुब अल्लाबक्ष मिरजे ( रा. कोरे कॅपिटल, पोलीस मुख्यालयासमोर, विश्रामबाग, सांगली ) यांनी फिर्याद विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, सहा संशयितांनी सेवानिवृत्त शिक्षक आयुब मिरजे यांच्याशी मैत्री केली. त्यांचा विश्वास संपादन केल्यावर त्यांना जादा परताव्याचे आमिष दाखविले. आरेंच्युअर या कंपनीची भारतातील शाखा आर्मस इंटरनॅशनल पुणे या कंपनीत गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत अधिक परतावा मिळत असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह धरला. फिर्यादी मिरजे यांनी विश्वास ठेवून संशयीतांनी सांगितल्याप्रमाणे २ कोटी १४ लाख ८७ हजार २०० रुपयांची गुंतवणूक केली. संशयितांनी काही कालावधीनंतर फिर्यादी मिरजे यांना परतावा म्हणून ६७ लाख ५९ हजार ६४८ रुपयांची रक्कम दिली. मात्र त्यानंतर परतावा मिळाला नाही. ही बाब मिरजे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुद्दलाची रक्कम परत मागितली. मात्र त्यास टाळाटाळ होवू लागली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे मिरजे यांच्या लक्षात आले. त्यानंतर काल, मंगळवारी (दि. २४) फिर्यादी मिरजे यांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस