नेर्ले येथे सेवानिवृत्त सैनिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:20+5:302021-03-13T04:48:20+5:30
नेर्ले (ता. वाळवा) येथे गुणवंत विद्यार्थी व सैनिकांचा सत्कार शुभम पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. लोकमत न्यूज नेटवर्क नेर्ले : ...

नेर्ले येथे सेवानिवृत्त सैनिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नेर्ले (ता. वाळवा) येथे गुणवंत विद्यार्थी व सैनिकांचा सत्कार शुभम पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रतिराज फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त सैनिक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.
नेर्ले गावचे पुत्र राजाराम कदम व विकास वाठारकर हे भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले व सई सचिन पाटील यांची पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सांगली जिल्ह्यात ६८ वा क्रमांक, समृद्धी सुहास पाटील यांची स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यात ६३ वा नंबर आला. याबद्दल यांचा वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे सदस्य शुभम पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य निवास माने, सुयोग पाटील, शामराव गावडे, धनाजी साळुंखे, सुभाष पाटील, बाबासाहेब वंजारी, बापूराव रणखांबे, संजय बल्लाळ, सखाराम मिसाळ, अरविंद रणखांबे, विकास पाटील, सचिन पाटील, श्रीकांत पाटील, वैभव पाटील, अतुल पाटील, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब वंजारी यांनी केले? सूत्रसंचालन निवास माने यांनी केले. अक्षय पाटील यांनी आभार मानले.