महापालिका एलईडी प्रकल्प याचिकेचा १४ रोजी निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST2021-09-08T04:33:19+5:302021-09-08T04:33:19+5:30
सांगली : महापालिकेच्या साठ कोटींच्या एलईडी प्रकल्पात अपात्र ठरविलेल्या ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स या कंपनीने महापालिका व समुद्रा इलेक्ट्राॅनिक्स यांच्याविरोधात ...

महापालिका एलईडी प्रकल्प याचिकेचा १४ रोजी निकाल
सांगली : महापालिकेच्या साठ कोटींच्या एलईडी प्रकल्पात अपात्र ठरविलेल्या ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स या कंपनीने महापालिका व समुद्रा इलेक्ट्राॅनिक्स यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून, १४ सप्टेंबर रोजी न्यायालयाकडून निकाल दिला जाणार आहे. या निकालाकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे.
महापालिका क्षेत्रात सुमारे ३३ हजार पथदिवे आहेत. या पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी ६० कोटी रुपयांची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली होती. तीनदा मुदतवाढ देऊन प्रकल्पासाठी समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स आणि ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स या दोन कंपन्यांच्या निविदा आल्या. त्यापैकी समुद्रा कंपनीला पात्र ठरविण्यात आले, तर अपूर्ण कागदपत्रांचा ठपका ठेवत ई-स्मार्टला अपात्र ठरविले गेले. याविरोधात आता ई- स्मार्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयात महापालिका, ई-स्मार्टच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच स्थायी समितीने समुद्रा कंपनीची निविदा मंजूर केली आहे. त्यात विनानिविदा समुद्रा कंपनीला काम देण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे. आता न्यायालयाचा निकाल काय लागतो, यावर प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.