डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल ९५.९१ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:50+5:302021-09-12T04:30:50+5:30
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचा निकाल ९५.९१ टक्के लागला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील संग्राम जाधव ...

डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल ९५.९१ टक्के
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचा निकाल ९५.९१ टक्के लागला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील संग्राम जाधव याने ८८.३० टक्के गुणांसह सर्व शाखांत प्रथम क्रमांक पटकावला अशी माहिती महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक प्राध्यापक आर. ए. कनाई यांनी दिली
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागात मारिया देसाई ८८.३० टक्के, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आकांक्षा पाटील ८४.५० टक्के, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अक्षता पाटील ८६.७० टक्के, सिव्हिल इंजिनिअरिंग अभिषेक पाटील ८६.९० टक्के, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग लखन मोरे ८३.८० टक्के, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सुमन यादव ८३.२० टक्के यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब डांगे, सचिव ॲड. चिमण डांगे, संचालक डॉ. विक्रम पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले, असे आर. ए. कनाई यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख प्रा. विजय पाटील, डीन ॲडमिनिस्ट्रेशन प्रा शैलेंद्र हिवरेकर, डीन अकॅडेमिक्स डॉ. सुयोग तारळकर, परीक्षा विभागप्रमुख प्रा. सचिन पाटील, प्रा. अभिजित जाधव उपस्थित होते.