गणपती बसविण्यास बंदी मागे घ्या

By Admin | Updated: September 18, 2015 23:33 IST2015-09-18T23:32:25+5:302015-09-18T23:33:30+5:30

हिंदुत्ववादी संघटनांची मागणी : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Restrict the ban to set up a Ganapati | गणपती बसविण्यास बंदी मागे घ्या

गणपती बसविण्यास बंदी मागे घ्या

सांगली : जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय कार्यालयात गणपती बसविण्यास विरोध करून जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांना दिलेली कारवाईची नोटीस त्वरित मागे घ्यावी, अन्यथा सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात येणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी शुक्रवारी दिला. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांना पाठविलेल्या पत्रात, गणपती बसविण्यास विरोध केला आहे. शिवाय गणपती बसविणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तो सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. इतकेच नव्हे, तर तो राज्यघटनेच्या कलमांचा चुकीचा अर्थ लावणारा आहे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी हणमंत पवार, श्रीकांत शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री सुभाष शिंगण, जिल्हामंत्री श्रीराम कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अरुण दळवी, बाळासाहेब वाळिंबे, दत्ताकाका कालगावकर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Restrict the ban to set up a Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.