सांगली अर्बन बँकेत लसीकरणाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:31 IST2021-09-07T04:31:32+5:302021-09-07T04:31:32+5:30

सांगली : सांगली अर्बन बँकेच्यावतीने आयोजित कोरोना लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली अर्बन बँक व सिरम इन्स्टिट्यूट ...

Response to Vaccination at Sangli Urban Bank | सांगली अर्बन बँकेत लसीकरणाला प्रतिसाद

सांगली अर्बन बँकेत लसीकरणाला प्रतिसाद

सांगली : सांगली अर्बन बँकेच्यावतीने आयोजित कोरोना लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली अर्बन बँक व सिरम इन्स्टिट्यूट यांच्यावतीने बँकेचे संस्थापक अण्णासाहेब गोडबोले यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आला. मोहिमेत शहरातील २५२ नागरिकांनी कोविड लसीचा लाभ घेतला. महिलांचा प्रतिसाद उस्फूर्त होता. बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ व मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांनी समाधान व्यक्त केले. ७ सप्टेंबर रोजी मिरज येथे व १२ रोजी सांगली येथे पुन्हा मोहीम होणार आहे. संबंधितांनी सांगली अर्बन बँकेच्या जवळच्या शाखेत नाव नोंदणी करावी व लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले. यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण, बँकेचे संचालक संजय धामणगावकर, संजय पाटील, बापू हरिदास, एच. वाय. पाटील, सागर घोंगडे, विवेकानंद हाॅस्पिटलचे राम लाडे उपस्थित होते.

Web Title: Response to Vaccination at Sangli Urban Bank