तासगावात ‘शिवार’च्या ‘डॉग शो’ला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:40 IST2021-02-23T04:40:37+5:302021-02-23T04:40:37+5:30

शिवार कृषी प्रदर्शनात शुक्रवारी डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. सांगली, जिल्ह्यासह परिसरातील डॉगनी यात सहभाग घेतला. यात ...

Response to Shivar's Dog Show in Tasgaon | तासगावात ‘शिवार’च्या ‘डॉग शो’ला प्रतिसाद

तासगावात ‘शिवार’च्या ‘डॉग शो’ला प्रतिसाद

शिवार कृषी प्रदर्शनात शुक्रवारी डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. सांगली, जिल्ह्यासह परिसरातील डॉगनी यात सहभाग घेतला. यात रॉट विलर, कारवान, मुधोळ, पष्मी, पग, जर्मन शेफर्ड, डॉबर मन, यासह इतर जातीच्या डॉगचा समावेश होता. हा डॉग शो पाहण्यासाठी अनेकानी एकच गर्दी केली होती.

तासगाव पशुविकास अधिकारी दीपक शेंडगे, विटा पशुविकास अधिकारी दीपक तारळेकर यांनी याचे परीक्षण केले. डॉग शो चे संयोजन स्वाभिमानी संघटनेचे गुलाबराव यादव यांनी केले. आयोजक महेश खराडे व मान्यवर यांच्या हस्ते उपस्थितीत विजेत्या श्वानास मानपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात आले, तर विजेत्या श्वानासह सहभागी झालेल्या डॉग मालकांचे महेश खराडे यांनी अभिनंदन करून आभार मानले. या ‘डॉग शो’साठी महेश जगताप, अशोक खाडे यांचे सहकार्य लाभले.

फाेटाे : २१ तासगाव १

Web Title: Response to Shivar's Dog Show in Tasgaon