‘हुतात्मा’च्या ऑनलाईन चर्चासत्रास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:33+5:302021-06-16T04:35:33+5:30
वाळवा : पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा तांत्रिक पद्धतीने शेती केल्यास प्रती एकरी १०० टन ऊस उत्पादन मिळेल, याशिवाय ...

‘हुतात्मा’च्या ऑनलाईन चर्चासत्रास प्रतिसाद
वाळवा : पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा तांत्रिक पद्धतीने शेती केल्यास प्रती एकरी १०० टन ऊस उत्पादन मिळेल, याशिवाय शेती परवडणार नाही असे प्रतिपादन डाॅ. अकुंश चोरमोले यांनी केले.
हुतात्मा साखर कारखान्याच्यावतीने ऑनलाईन ऊस विकास चर्चासत्रात ते बोलत होते.
डॉ. चोरमोले म्हणाले पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे दिवस आता संपले आहेत. वाढती महागाई, कोरोना सकंट यामुळे शेती उत्पादनावर अवलंबून असणाऱ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केल्या शिवाय परवडणार नाही.
आडसाली लागणीपूर्वी शेतीत पूर्व मशागत, शेणखत, हिरवळीचे खत, याचा अवलंब करावा. एक डोळा, दोन डोळा नर्सरी बियाणे रोपे आणून लावावे.
या ऑनलाईन चर्चा सत्रात कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी, उपाध्यक्ष बाबुराव बोरगावकर, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, पी. पी. चव्हाण, ओमकार खोत, संचालक व सभासद उपस्थित होते.