महापालिकेच्या ऑनलाईन योग शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST2021-06-22T04:18:31+5:302021-06-22T04:18:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित जिल्हा प्रशासन, क्रीडाधिकारी कार्यालय आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन योग ...

Response to Municipal Online Yoga Camp | महापालिकेच्या ऑनलाईन योग शिबिराला प्रतिसाद

महापालिकेच्या ऑनलाईन योग शिबिराला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित जिल्हा प्रशासन, क्रीडाधिकारी कार्यालय आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन योग शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह ५०० जणांनी शिबिराचा लाभ घेतला.

आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या क्रीडा विभागाने या शिबिराचे नियोजन केले होते. पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमानचे जिल्हाप्रमुख शाम वैद्य यांनी योग प्रकारांची माहिती दिली. या शिबिरात महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, महापालिकेचे क्रीडाधिकारी महेश पाटील, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, राहुल ढोपे पाटील, मंगल वैद्य, अमेय कुलकर्णी, श्रावणी देशपांडे, चैतन्य कलकुटगी, यल्लप्पा माळी, आदींनी सहभाग घेतला होता. न्यू अजिंक्य मंडळाच्या सभागृहात हे योग शिबिर पार पडले.

Web Title: Response to Municipal Online Yoga Camp