मदनी ट्रस्टच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST2020-12-14T04:38:42+5:302020-12-14T04:38:42+5:30

शिबिराचे उद्घाटन आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. वसीम मुजावर, डॉ. सरफराज खान, डॉ. शबनम खान, डॉ. ...

Response to Madani Trust's Blood Donation Camp | मदनी ट्रस्टच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

मदनी ट्रस्टच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

शिबिराचे उद्घाटन आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. वसीम मुजावर, डॉ. सरफराज खान, डॉ. शबनम खान, डॉ. राजकुमारी आहुजा, डॉ. अब्दुल पटवेगार उपस्थित होते.

यावेळी मदनी ट्रस्टचे सल्लागार न्यूरोतज्ज्ञ डॉ. वसिम मुजावर यांच्याहस्ते कोरोना योद्धा म्हणून आयुक्त नितीन कापडणीस यांचा सन्मान करण्यात आला. मदनी ट्रस्ट, जमियत उलेमा हिंद, खान क्लिनिकने रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे कापडणीस म्हणाले.

यावेळी रक्तदात्यांचा सन्मान मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. शिबिराचे संयोजन जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, मदनी ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सूफियान पठाण यांनी केले. वसंतदादा ब्लड बँकेने रक्तसंकलन केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी हाजी आरिफ, हाफिज आलीम, सद्दाम जमादार, तोसिफ कडलास्कर, हापिस गाैस हमीद तांबोळी, मौलाना कलिम मुल्ला, सलीम शेख यांनी परिश्रम घेतले.

फाेटाे : १३ ग्राम १

Web Title: Response to Madani Trust's Blood Donation Camp