खानापुरात ‘लोकमत’च्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST2021-07-16T04:18:59+5:302021-07-16T04:18:59+5:30

खानापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी खानापूर ...

Response to Lokmat's blood donation camp in Khanapur | खानापुरात ‘लोकमत’च्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

खानापुरात ‘लोकमत’च्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

खानापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी खानापूर येथे लायन्स क्लब ऑफ खानापूर व ‘लोकमत’च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन डॉ. किरण नरदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब ऑफ खानापूरचे अध्यक्ष ॲड. युवराज गोडसे, सचिव शाहरुख पठाण, माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे, ॲड. विराज माने, माजी प्राचार्य व्ही.जी. बिराजदार, तानाजी ठोंबरे उपस्थित होते.

रक्तदान शिबिर डॉ. किरण नरदे हाॅस्पिटल येथे पार पडले.

यांनी केले रक्तदान

ॲड. विराज माने, माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे, अनिल माळी, ॲड. युवराज गोडसे, विराज भगत, शाहरूख पठाण, विजय जांभळे, अभिजित भगत, सुयोग पाटील, विश्वजीत पाटील, नीलेश डोंगरे, बसवराज जत्ते, वैभव शिंदे, पांडुरंग भुईस, गणेश तोडकर, रवींद्र टिंगरे, रोहित खराडे, बापूसाहेब गुळीक, सागर खराडे, अस्लम मुजावर, फय्याज पठाण, अभिजित डोंगरे, रोहित देसाई, सागर जिरगे यांनी रक्तदान केले.

Web Title: Response to Lokmat's blood donation camp in Khanapur