पलूसमध्ये लॉकडाऊनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:44+5:302021-04-11T04:25:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पलूस : पलूस तालुक्यासह शहरात विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला. शासकीय आदेशानुसार सकाळी काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ...

पलूसमध्ये लॉकडाऊनला प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : पलूस तालुक्यासह शहरात विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला. शासकीय आदेशानुसार सकाळी काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडली होती. मात्र, रस्त्यावर कोणीही नागरिक येण्यास तयार नसल्याने तीही बंद करण्यात आली. यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट होता.
शासनाने आधीच्या अध्यादेशात सरसकट सर्व व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आदेश दिले होते; पण सुधारित आदेशात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली; पण पोलिसांच्या कारवाईला घाबरून कोणी घराबाहेरच आले नाही. यामुळे दुकाने उघडी ठेवून तरी काय फायदा, असा विचार करुन सकाळी काहीवेळ जीवनावश्यक वस्तूंची उघडलेली दुकाने व्यापाऱ्यांनी दुपारनंतर ग्राहकांअभावी बंद केली.
नागरिकांनी अजिबात घराबाहेर न पडता अगदी आवश्यक असेल तरच बाहेर पडणे हा नियम पाळला. त्यामुळे शहरात शुकशुकाट होता. या लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने व्यापाऱ्यांनी तहसीलदारांशी सल्लामसलत करून जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी इच्छेनुसार दुकाने बंद ठेवण्याचा पर्याय निवडला.