आष्टा येथे नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST2021-02-14T04:24:58+5:302021-02-14T04:24:58+5:30

आष्टा : येथील जायंट्स ग्रुप व मिरजेच्या नॅब आय हॉस्पिटल यांच्या वतीने आष्टा ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत नेत्र तपासणी व ...

Response to eye check-up camp at Ashta | आष्टा येथे नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद

आष्टा येथे नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद

आष्टा : येथील जायंट्स ग्रुप व मिरजेच्या नॅब आय हॉस्पिटल यांच्या वतीने आष्टा ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यात २५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ९० रुग्णांची शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली.

जायंट्स इंटरनॅशनलचे केंद्रीय समिती सदस्य दिवंगत काकासाहेब चितळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष निगडी यांनी केले. जायंट्सचे अध्यक्ष समीर गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर सचिव प्रा. सूर्यकांत जुगदार यांनी आभार मानले.

यावेळी डॉ. मनोहर कबाडे, डॉ. सतीश बापट, आर. आर. उंटवाल, एन. डी. कुलकर्णी, डॉ. अनिल निर्मळे, डॉ. दीपक लिगाडे, महावीर थोटे, राजेंद्र सावंत, चारुदत्त वठारे, उपाध्यक्ष प्रा. विलासराव पाटील, सहसचिव बाबासाहेब सिद्ध, नॅब आय हॉस्पिटलचे विजयकुमार यादव, राजाराम माळी, शिराज मुजावर, सुलताना जमादार, ‘सहेली’च्या अध्यक्ष स्नेहा लिमये, उषा बापट, पोपट नाझरे उपस्थित होते.

फोटो-१३आष्टा१

फोटो : आष्टा येथे नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. संतोष निगडी, समीर गायकवाड, डॉ. मनोहर कबाडे, बाबासाहेब सिद्ध, चारुदत्त वठारे, उषा बापट आदी उपस्थित होते.

Web Title: Response to eye check-up camp at Ashta