हुतात्मा नर्सिंग कॉलेजमध्ये आहार प्रदर्शनास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:22+5:302021-01-08T05:28:22+5:30

वाळवा : वाळवा येथील हुतात्मा नर्सिंग काॅलेजच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थिनींनी आहार प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यास उत्स्फूर्त ...

Response to Diet Exhibition at Hutatma Nursing College | हुतात्मा नर्सिंग कॉलेजमध्ये आहार प्रदर्शनास प्रतिसाद

हुतात्मा नर्सिंग कॉलेजमध्ये आहार प्रदर्शनास प्रतिसाद

वाळवा : वाळवा येथील हुतात्मा नर्सिंग काॅलेजच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थिनींनी आहार प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यास उत्स्फूर्त यश मिळाले.

सहा वर्षांच्या आतील बालके, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गरोदर माता आणि विविध आजारांतील रुग्ण यांना देण्यात येणाऱ्या आहाराची उपस्थितांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

यावेळी थालीपीठ, आप्पे, इडली, शिरा, उपमा, शेंगदाणा चिक्की, टोमॅटो, काकडी, ज्वारीची भाकरी, शाबूची खीर, कोरा चहा यासहित तीसहून अधिक पदार्थांचे स्टाॅल मांडण्यात आले होते.

हुतात्मा नर्सिंग काॅलेजची २००८ ला सुरुवात झाली. प्रत्येक बॅचला २० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. चालू वर्षाची बारावी बॅच आहे. आतापर्यंत दहा बॅच पूर्णपणे बाहेर पडल्या आहेत. यातील दोनशेवर मुली नोकरीस लागल्या आहेत, अशी माहिती प्रा. हाशिम वलांडकर यांनी दिली. यावेळी अनेक विद्यार्थिनींनी न्यूट्रिशनचे महत्त्व विशद केले. यावेळी प्राचार्या, प्राध्यापिका, व्यवस्थापिका, प्राध्यापक उपस्थित होते.

Web Title: Response to Diet Exhibition at Hutatma Nursing College