काँग्रेसच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST2021-04-15T04:26:07+5:302021-04-15T04:26:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी महारक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यास प्रतिसाद ...

Response to Congress Blood Donation Camp | काँग्रेसच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

काँग्रेसच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी महारक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यास प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्याहस्ते झाले.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कोरोना महामारीमुळे राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यभर रक्तदान शिबिरे घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सांगलीत शिबिर घेतल्याची माहिती यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

यावेळी काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील, नगरसेविका वहिदा नाईकवडी, शुभांगी साळुंखे, नगरसेवक संजय मेंढे, फिरोज पठाण, मनोज सरगर, प्रशांत मुळके, मनोज सरगर, अमर निंबाळकर, रवींद्र वळवडे, इलाही बारूदवाले, संजय कांबळे, आशा पाटील, क्रांती कदम, उषा पाटील, विजय आवळे, रवींद्र खराडे आदी उपस्थित होते.

Web Title: Response to Congress Blood Donation Camp