खरसुंडीत रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST2020-12-14T04:38:31+5:302020-12-14T04:38:31+5:30
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धनाथ विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ...

खरसुंडीत रक्तदान शिबिराला प्रतिसाद
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धनाथ विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यास गावातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
काेविडमुळे रक्ताचा तुटवडा उद्भवलेला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत, श्री सिद्धनाथ विद्यालयचे प्राचार्य रवींद्र पुजारी यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तरुण व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय सल्लागार विलास नाना शिंदे, प्राचार्य रवींद्र पुजारी, नूतन उपसरपंच सलिमा शिकलगार, माजी उपसरपंच अर्जुन सावकार, सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम इंगवले, जितेंद्र पाटील, शिक्षक नेते विश्वास पुजारी, विनोद पुजारी, विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सांगलीचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.