‘सखी मंच’ सोडतीत ३६ सखी भाग्यवान..पाककला प्रशिक्षणाला प्रतिसाद

By Admin | Updated: October 22, 2014 00:25 IST2014-10-22T00:06:25+5:302014-10-22T00:25:27+5:30

३७ हजारांची बक्षिसाची रक्कम : विद्या शिंदे ठरल्या दुहेरी विजेत्या

Response to 36 Sakhi Bhagyavana..Pakala Training in 'Sakhi Manch' | ‘सखी मंच’ सोडतीत ३६ सखी भाग्यवान..पाककला प्रशिक्षणाला प्रतिसाद

‘सखी मंच’ सोडतीत ३६ सखी भाग्यवान..पाककला प्रशिक्षणाला प्रतिसाद

इस्लामपूर : ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने २0१४ या वर्षासाठी सदस्यत्व स्वीकारलेल्या सखी सदस्यांमधून भाग्यवान सोडत काढण्यात आली. ३७ हजार रुपये बक्षिसाची रक्कम असणाऱ्या या सोडतीमध्ये ३६ सखी सदस्या भाग्यवान ठरल्या.
इस्लामपूर येथील विजया सांस्कृतिक भवनमध्ये पाककला प्रशिक्षणावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सौ. प्रतिभा वाळवेकर, स्वाद कुकिंग क्लासेसच्या संचालिका सौ. सबा शेख, राखी शहा यांच्याहस्ते ही भाग्यवान सोडत काढण्यात
आली. वाळवेकर इलेक्ट्रॉनिक्सच्यावतीने पुरस्कृत करण्यात आलेल्या बक्षिसांसाठी वृषाली लोहार (0५४७४0), विद्या शिंदे (0५४४0३), स्मिता जाधव (0५४९१६), वंदना पवार (0५४४५७), नीलिमा माळवदे (0५४१४१), उज्ज्वला जाधव (0५४९१४), सविता जाधव (१५२६६0), अनिता करळे (0५४२४८), वैशाली देसावळे (0५४४१६), लता कुलकर्णी (0५५२८८), कविता शेळके (0५९१३२), अपर्णा घाटगे (0५४२0७), कुसूम यादव (0५४८६0), सुविधा खराडे (0५४५४४), उज्ज्वला वाघमारे (0५४८४२), सुवर्णा सुतार (0५९२७७) या भाग्यवान सखी ठरल्या.मुक्तांगण प्ले स्कूल प्रायोजित बक्षिसाच्या विजेत्या अनिता यादव (0५४१९१), चांदणी शहा (0५९२३४), माधुरी पाटील (0५४३७३), स्वाती चव्हाण (0५९१४४), विद्या शिंदे (0५४४0३), भारती तांदळे (0५५२५४), माधुरी खैरे (0५४९४२), शकुंतला भोसले (0५४८४५), गौरी शहा (0५४२५४), मधुरादेवी पवार (0५९0३८) या ठरल्या.
विद्यासागर आॅप्टिकल्सच्या बक्षिसांसाठी भाग्यश्री कंसारा (0५५४७३), वंदना कुलकर्णी (0५४१४0), राजश्री घळगे (0५४५९९), सुरेखा लवटे (0५५१२८), वंदना गावडे (0५९0४३), संगीता टेके (0५५२६३), सुरेखा कांबळे (0५४१७0), राजश्री संकपाळ (0५४१४६), मीनाक्षी कुंभार (0५४८९१), मीनाक्षी शिंदे (0५४७0५) या भाग्यवान सखी सदस्या ठरल्या आहेत.
सखी मंचच्या पुढील कार्यक्रमात वरील बक्षिसांचे वितरण विजेत्या सखी सदस्यांना करण्यात येणार असल्याचे सखी मंच संयोजिकांनी सांगितले. (वार्ताहर)

पाककला प्रशिक्षणाला इस्लामपुरात प्रतिसाद-- दिवाळीनिमित्त आयोजन : सखींना टिप्स
इस्लामपूर : ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककला प्रशिक्षणात शेफ आदिनाथ डोळ (सांगली) व शेफ सरदार जोसेफ (गोवा) यांनी अवघड वाटणाऱ्या पाककलेच्या सोप्या सोप्या टिप्स देत सखींना पाककलेच्या विषयात रममाण केले. जवळपास सहा तास चाललेल्या या प्रशिक्षणाचा लाभ सखींनी मोठ्या उत्साहाने घेतला.
येथील विजया सांस्कृतिक भवनमध्ये ‘लोकमत’ सखी मंच व वाळवेकर इलेक्ट्रॉनिक्सच्यावतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाककला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान गॅस व मायक्रोव्हेवमधील पदार्थ बनविण्यासह मिठाई, कॉन्टीनेंटल, इटालियन व इंडियन पदार्थ शिकण्याची मेजवानी सखींना मिळाली. शेफ आदिनाथ डोळ व जोसेफ सरदार यांनी गॅसवरील पदार्थ, तर दुपारी मायक्रोव्हेवमधील पदार्थांचे प्रशिक्षण दिले. क्रीम आॅफ टोमॅटो सूप, व्हेज गोल्ड कॉईन, हरा— भरा कबाब, व्हेज अ‍ॅग्रा— ३, पनीर रायता, मार्गरेट पिझ्झा, शाही तुकडा यासह अनेक पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण सखींना देण्यात आले.
या उपक्रमाचे प्रायोजक वाळवेकर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक प्रकाश वाळवेकर यांनी दिवाळीनिमित्त सखी सदस्यांसाठी खरेदीवर असणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली. शेफ डोळ व सरदार यांनी सखींच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देतानाच स्वयंपाक घरातील टिप्सही दिल्या.
वृषाली डोळ यांनी पिझ्झा बेस बनवताना कोमट पाण्यात ईस्ट व साखर घालावी, पदार्थ खारट झाला तर त्यामध्ये कणकेचा गोळा सोडावा, पालक उकळत्या पाण्यातून ब्लांच करताना सायट्रिक अ‍ॅसिड किंवा व्हिनेगर टाकावे, भेंडी टिकवायची असेल तर मधे काप देऊन डीप फ्राय करुन फ्रीजमध्ये ठेवावी, अशा टिप्स दिल्या. टोमॅटो शोरबा, अजीनोमोटो, रबडीविषयी त्यांनी माहिती दिली.
यावेळी सौ. प्रतिभा वाळवेकर, गीता वाळवेकर, प्रीती वाळवेकर, संदीप वाळवेकर, किरण वाळवेकर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी सखींना अल्पोपहार देण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Response to 36 Sakhi Bhagyavana..Pakala Training in 'Sakhi Manch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.