शेरनवाब देवळे व धैर्यशील थोरात यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:36+5:302021-07-08T04:18:36+5:30

आष्टा येथे नूतन उपनगराध्यक्ष शेरनवाब देवळे व स्वीकृत नगरसेवक धैर्यशील थोरात यांचा सत्कार वैभव शिंदे, विशाल शिंदे, झुंजारराव ...

Respect to Shernawab Deola and patient Dharat | शेरनवाब देवळे व धैर्यशील थोरात यांचा सत्कार

शेरनवाब देवळे व धैर्यशील थोरात यांचा सत्कार

आष्टा येथे नूतन उपनगराध्यक्ष शेरनवाब देवळे व स्वीकृत नगरसेवक धैर्यशील थोरात यांचा सत्कार वैभव शिंदे, विशाल शिंदे, झुंजारराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विराज शिंदे, संग्राम फडतरे, स्नेहा माळी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शेरनवाब देवळे व स्वीकृत नगरसेवकपदी धैर्यशील थोरात यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांना अभिवादन केले. यावेळी राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे ,प्राचार्य विशाल शिंदे व माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी वैभव शिंदे म्हणाले, दिवंगत माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आष्टा शहर हे कुटुंब मानून शहरातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाला चालना दिली. शहराचा सर्वांगीण विकास केला. भविष्यातही आष्टा शहर विकास आघाडी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, राजारामबापू दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, पोपट शेळके, नगराध्यक्षा स्नेहा माळी, माजी उपनगराध्यक्ष प्रतिमा पेटारे, अर्जुन माने, रुक्मिणी अवघडे, मनीषा जाधव, धैर्यशील शिंदे, पी. एल. घस्ते, सतीश माळी, अनिल बोंडे, अ‍ॅड. अभिराजे थोरात उपस्थित होते.

Web Title: Respect to Shernawab Deola and patient Dharat