नेर्लेतील शाळेच्या जागेचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:12+5:302021-02-07T04:24:12+5:30
नेर्ले : येथील जि. प. मराठी मुलांची शाळा नंबर-२च्या जागेचा प्रश्न पालकमंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या ...

नेर्लेतील शाळेच्या जागेचा प्रश्न निकाली
नेर्ले : येथील जि. प. मराठी मुलांची शाळा नंबर-२च्या जागेचा प्रश्न पालकमंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नातून निकालात निघाला आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली असल्याची माहिती सरपंच छाया रोकडे व संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाळा नंबर-२ची पूर्वीची इमारत गावच्या पूर्वेस होती. त्याकाळी या शाळेचे भूमिपूजन लोकनेते राजारामबापू पाटील यांनी केले होते. कालपरत्वे इमारत जुनी झाल्यानंतर गावात सि. स. नंबर २४९० मधील जागेत या शाळेचे बांधकाम सुरू झाले. यावेळी ही जागा शासनाच्या मालकीची असल्याने बांधकामास अडचण निर्माण झाली. पालकमंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी याकामी लक्ष घातल्याने जागेचा प्रश्न निकालात निघाला आहे. महसूल मुक्त व भोगवटा मूल्य मुक्त रीतीने इमारत बांधकामासाठी काही अटीवर जागा मंजूर झाली आहे. तसे पत्र कार्यासन अधिकारी महसूल व वनविभाग विनोद वसे यांनी दिले आहे. लवकरच या जागेवर एक सुसज्ज इमारत बांधकाम व्हावे अशी मागणी करणार आहे, अशी माहिती संजय पाटील यांनी दिली.
यावेळ कृष्णाजी माने, जयसिंग पाटील, विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल साळुंखे, विजय पाटील, बाळासाहेब रोकडे, संजय पाटील, बापूराव बसवत आदी उपस्थित होते.
चाैकट
वाडी-वस्तीवर पाणी देणार
गावचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला असून जलजीवन मिशन अंतर्गत पाइपलाइन व वाडी-वस्तीवर पाइपलाइन, पाण्याची टाकी व भविष्यातील गरज लक्षात घेऊन वाडीवस्तीवर पाण्याची टाकी या कामाचा आराखडा तयार करण्याचे काम चालू झाल्याचे सरपंच छाया रोकडे यांनी सांगितले.