चालकांचे शासनाकडील प्रलंबित प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:45+5:302021-08-15T04:27:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय चालकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत, पण चालकांचे संघटन नसल्यामुळे त्यांचे ...

Resolve pending issues of drivers with the government | चालकांचे शासनाकडील प्रलंबित प्रश्न सोडविणार

चालकांचे शासनाकडील प्रलंबित प्रश्न सोडविणार

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय चालकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत, पण चालकांचे संघटन नसल्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्यात अडचणी येत होत्या. सध्या चालकांची स्वतंत्र संघटना झाल्यामुळे शासनाकडे त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी दिले.

सांगलीत शनिवारी कास्ट्राईब महासंघातर्फे शासकीय व निमशासकीय कार्यालयातील वाहनचालकांची संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी गणेश मडावी बोलत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, शासकीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे. के. महाडिक, डी. जी. मुलाणी, उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे, पी. एन. काळे, संजय व्हनमाणे, संजय कंबळे, जाकीरहुसेन चौगुले, राजाराम चोपडे आदींसह वाहनचालक उपस्थित होते.

चौकट

चालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अमजदखान मिरजकर

जिल्ह्यातील ४२ विभागांतील सर्व संघटनांचे एकत्रीकरण करून वाहनचालकांना प्रवाहात आणण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष अमजदखान मिरजकर, कार्याध्यक्षपदी प्रदीप कोळी, सचिव भारत आलासकर, वरिष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत वरुडे, कोषाध्यक्षपदी एस. एस. जावीर यांची निवड करण्यात आली.या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Resolve pending issues of drivers with the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.