धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:57+5:302021-03-30T04:16:57+5:30
फोटो ओळ : सांगली येथे सत्यजित देशमुख यांनी जिल्हाधिकारी अभिजित चाैधरी यांच्याशी धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. ...

धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवा
फोटो ओळ : सांगली येथे सत्यजित देशमुख यांनी जिल्हाधिकारी अभिजित चाैधरी यांच्याशी धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी पुनर्वसनाच्या अनेक प्रश्नांबाबत चर्चा झाली.
पुनर्वसन लोकांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत. वारंवार याबाबत मंत्रालय स्तरावर तसेच जिल्हाधिकारी, त्याचबरोबर पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे प्रश्न मांडण्यात आलेले आहेत. यापैकी काही प्रश्नांची सोडवणूक झाली; परंतु अद्याप ही जमीन वाटप, जमीन संकलन दुरुस्ती, कूळ जमीन संपादन, निर्वाह भत्ता, घर अनुदान, गोटा अनुदान, धरणग्रस्त दाखले असे अनेक विविध प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, अरविंद पाटील, आनंद वकटे, गणेश पाटील, बाळू जाधव, अधिक चरापले, तुकाराम सराफदार यांच्यासह धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त उपस्थित होते.