‘त्या’ सहा जागांचे ठराव होणार विखंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST2020-12-26T04:22:10+5:302020-12-26T04:22:10+5:30

महापालिकेच्या महासभेत उपसूचनेद्वारे काही जागा भाडेपट्टी देण्याचे ठराव करण्यात आले आहेत. कोरोनामुळे सभा सभागृहात झालेली नाही. त्याचा फायदा ...

The resolution of 'those' six seats will be fragmented | ‘त्या’ सहा जागांचे ठराव होणार विखंडित

‘त्या’ सहा जागांचे ठराव होणार विखंडित

महापालिकेच्या महासभेत उपसूचनेद्वारे काही जागा भाडेपट्टी देण्याचे ठराव करण्यात आले आहेत. कोरोनामुळे सभा सभागृहात झालेली नाही. त्याचा फायदा उचलत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या पुढाकाराने या मोक्याच्या जागा नाममात्र भाडेपट्टीने देण्याचा ठराव करण्यात आला होता. यामध्ये माधवनगर रोडवरील बंद जकात नाक्‍याची जागा, कोल्हापूर रोडवरील आदिसागर मंगल कार्यालयाजवळच्या बंद जकात नाक्‍याची जागा आणि कुपवाडमधील एक मोक्‍याची जागा यांचा समावेश होता. हे ठराव मंजूर करण्यात आले होते. मात्र त्यामध्ये थेट संबंधित व्यक्तीला जागा नऊ वर्षाच्या मुदतीने भाड्याने देण्याचा उल्लेख करण्यात आल्याने वादंग निर्माण झाले. नागरिक जागृती मंचसह सर्वपक्षीय कृती समितीनेही या जागा नाममात्र भाडेपट्टीने देण्यास विरोध केला. या जागा ई लिलावाने द्याव्यात, अशी मागणी झाल्यानंतर आयुक्तांनीही तसे आदेश मालमत्ता विभागाला दिले होते.

नुकत्याच झालेल्या ऑनलाईन महासभेत भाजपचे नगरसेवक प्रकाश ढंग यांनी याबाबत प्रश्‍न उपस्थित करुन, अशा किती जागांचे ठराव आहेत आणि ते विखंडित करण्याचे काय झाले, याची माहिती देण्याची मागणी केली. यावर सहायक आयुक्त पराग कोडगुले यांनी, भाडेपट्टीचे सहा जागांचे ठराव निदर्शनास आले असून ते विखंडित करण्याचे प्रस्तावही तयार केले असून ते आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले होते. आयुक्तांच्या मान्यतेनंतर हे ठराव विखंडितसाठी शासनाकडे पाठविले जाणार आहेत.

Web Title: The resolution of 'those' six seats will be fragmented