शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

राजीनामा अन् बाँड तयार होता, तरीही बंडखोरी का?, पृथ्वीराज पाटील यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 11:43 IST

जयश्रीताईंनी असे करायला नको होते - बाळासाहेब थोरात 

सांगली : मी आमदार झालो तर पुढील निवडणूक न लढविण्याबाबत पाचशेच्या बाँडवर वचन तसेच शहराध्यक्षपदाचा राजीनामा अशा दोन अटी मला घातल्या गेल्या. त्या पूर्ण केल्या तर जयश्रीताई पाटील अर्ज मागे घेतील, असे सांगण्यात आले. राजीनामा व बाँड दोन्हीही तयार होते; तरीही त्यांनी बंडखोरी का केली, असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीवाडी येथील सभेत उपस्थित केला.सांगलीवाडीच्या चौकात काँग्रेसची प्रचारसभा पार पडली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील म्हणाले, जयश्रीताईंनी अर्ज मागे घ्यावा म्हणून मी स्वत: दोन वेळा त्यांना भेटलो. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मला त्यांनी ज्या दोन अटी घातल्या होत्या, त्या मान्य केल्या.राजीनामापत्र व पाचशे रुपयांचा बाँड तयार ठेवला होता. त्याची कल्पना देऊनही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यांच्या या बंडखोरीमागे नेमके कोण आहे, याचा तपास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जरूर घ्यावा. त्यांना भाजपचा पराभव करायचा आहे की पृथ्वीराज पाटील यांचा हे त्यांनी सांगावे.माझ्याबरोबर जाऊ नये म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांवर दबाव टाकण्यात आला. सांगलीवाडीतील बहुतांश माजी नगरसेवकांनी हा दबाव झिडकारून मला साथ दिली. लोकांनी ठरविले तर कोणाचे काही चालत नाही. नागरिकांनी विश्वास दिल्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला आहे, असे पाटील म्हणाले.

त्यांनी असे करायला नको होते - बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज की जयश्रीताई असा पेच आमच्यासमोर होता. दोन्हीही नेते आमच्यासाठी महत्त्वाचे होते. मात्र, मागील पाच वर्षांत पृथ्वीराज पाटील यांनी जे काम केले त्याची दखल घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीच पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी निश्चित केली. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महामंडळ तसेच शेवटी विधान परिषद सदस्यत्व देण्याचेही वचनही जयश्रीताईंना दिले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करायला नको होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024