शिराळा बाजारात शेतकऱ्यांसाठी जागा आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:47+5:302021-09-05T04:30:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील बाजारादिवशी शेतकऱ्यांसाठी मुख्य बाजारपेठेत काही जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती शिराळा ...

शिराळा बाजारात शेतकऱ्यांसाठी जागा आरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील बाजारादिवशी शेतकऱ्यांसाठी मुख्य बाजारपेठेत काही जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती शिराळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष सुनीता निकम यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवार, दि. ६ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सोमवार पेठेत बाजारादिवशी शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी जागा मिळण्याबाबत अडवणूक होत आहे. पंचक्रोशीतील कष्टकरी, शेतकऱ्यांचे जागेअभावी हाल सुरू आहेत. या विषयाबाबत येथील युवकांनी शेतकऱ्यांकरिता संपूर्ण बाजारपेठेत मधली लाईन (जागा) आरक्षित व्हावी, यासाठी आवाज उठवला होता.
नगराध्यक्ष सुनीता निकम व प्रशासनाला याविषयी निवेदनही देण्यात आले. यावेळी सुनीता निकम व नगर पंचायत प्रशासनाने बाजारादिवशी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मुख्य बाजारपेठेतील मधली लाईन (जागा) आरक्षित करण्याची स्पष्ट ग्वाही दिली.
यावेळी लालासाहेब शिंदे, कुलदीप निकम, कैलास देसाई, राहुल खबाले, नितेश निकम, तुषार यादव, सुमित निकम, अविनाश निकम, अजिंक्य पाटील, राहुल निकम फौजी, आदिनाथ इंगवले, सत्यम पोटे, यश इंगवले आदी उपस्थित होते.