कडेगावात मंगळवारी सरपंच पदाच्या आरक्षण सोडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:33+5:302020-12-11T04:53:33+5:30
कडेगाव तालुक्याची १ लाख ३१ हजार १९८ इतकी लोकसंख्या असून तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींपैकी प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणानुसार खुल्या ...

कडेगावात मंगळवारी सरपंच पदाच्या आरक्षण सोडती
कडेगाव तालुक्याची १ लाख ३१ हजार १९८ इतकी लोकसंख्या असून तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींपैकी प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणानुसार खुल्या गटासाठी ३३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद असणार आहे. त्यामध्ये १७ महिलांना संधी मिळणार आहे. इतर मागास प्रवर्गासाठी १५ जागा या आरक्षित आहेत. त्यामध्ये ८ महिलांसाठी असणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच पदाच्या ६ जागांपैकी ३ महिलांसाठी राखीव असणार आहेत. तालुक्यात एकंदरीत २८ तालुका ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षण राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
चौकट
नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी मंगळवारी ११ वाजता कडेगाव पंचायत समितीच्या सभागृहात कडेगाव तालुक्यातील मतदार व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी केले आहे.