शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी

By admin | Updated: April 15, 2017 00:03 IST

अर्थमंत्र्यांनी हात वर केलेत, वीज जोडणार कशी?; खासदार, आमदारांचा अधिकाऱ्यांना सवाल

सांगली : सांगली जिल्हा वीज बिल वसुलीत आघाडीवर असतानाही अर्थमंत्र्यांनी १६ हजार शेतीपंपांच्या वीज जोडणीसाठी पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वीज जोडणी कशी करणार, असा सवाल करत खासदार, आमदारांनी शुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निधीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. बोगस बियाणे, खते तपासणीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही खासदार, आमदारांनी केला.खरीप हंगामाच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार मोहनराव कदम, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त रवींद्र खेबूडकर, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हणुमंत गुणाले, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.कृषी विभागाचा आढावा साबळे आणि कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले यांनी दिला. भोसले यांनी, गेल्या वर्षभरात एकही बोगस बियाणे आणि खताचे प्रकरण आढळून आले नसल्याचे सांगितले. त्यावर आ. नाईक व बाबर म्हणाले की, पथके नक्की जिल्ह्यात तपासणी करतात का? भाताचे नमुने शेतकऱ्यांना बोगस आढळून आल्याच्या शिराळ्यातील शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. आटपाडीत कापूस कंपन्यांकडून बोगस बियाणांचा पुरवठा झाला आहे. मात्र शेतकऱ्यांना भरपाई दिली जात नाही. तरीही बोगस बियाणे, खते नसल्याची चुकीची माहिती का देता?त्यावर खा. पाटील यांनीही गुळमुळीत उत्तरे देताच कंपन्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, असा दम आ. नाईक व बाबर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना भरला. बोगस बियाणे, खतावरून आमदार, खासदार आक्रमक झाल्यामुळे पालकमंत्री देशमुख यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन, कागदोपत्री तपासण्या करू नका, असा इशारा दिला. यापुढे असा बोगस कारभार चालणार नाही, प्रत्यक्ष कारवाई करून अहवाल देण्याची अधिकाऱ्यांना सूचना त्यांनी दिली.महावितरणकडून १६ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी न दिल्याचा मुद्दा आ. बाबर, नाईक यांनी उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात महावितरणचे अधिकारी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. मुनगंटीवार यांनी, वीज जोडणीसाठी निधी देऊ शकत नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना वीज जोडणी कशी देणार आहेत, असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. उलट तुमच्याकडील ३५८ कोटींची थकबाकी वसूल करून तो निधी तेथे वापरण्याची सूचना दिली. आम्ही वसूल केलेला निधी तर जिल्ह्यासाठी मिळणार याची खात्री ते देणार आहेत का, असा प्रश्न संजयकाका पाटील, बाबर यांनी उपस्थित केला.पालकमंत्री देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील खासदार, आमदारांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांची समस्या सांगू. ते निश्चित निधी देतील. जर त्यांनी निधी दिलाच नाही, तर थकबाकी वसुली करून तो निधी आम्हाला खर्च करण्याची परवानगी लेखी घेऊन वसुलीसाठी प्रयत्न करूया. काहीही करू, पण शेतकऱ्यांना येत्या वर्षभरात वीज जोडणी देण्याचा प्रयत्न राहील.