बेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांसाठी कामे कळवा : एस. के. माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:26 PM2019-06-20T13:26:57+5:302019-06-20T13:30:30+5:30

शासनाच्या सर्व कार्यालयातील उपलब्ध कामे बेरोजगारांच्या संस्थांना मिळण्याकरिता सदर कामे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली यांना कळविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी यांनी केले आहे.

Report work for unemployed service societies: S. Of Gardener | बेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांसाठी कामे कळवा : एस. के. माळी

बेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांसाठी कामे कळवा : एस. के. माळी

Next
ठळक मुद्देबेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांसाठी कामे कळवा : एस. के. माळीमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याविषयी जनजागृती करा

सांगली : शासनाच्या सर्व कार्यालयातील उपलब्ध कामे बेरोजगारांच्या संस्थांना मिळण्याकरिता सदर कामे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली यांना कळविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी यांनी केले आहे.

शासन निर्णय दिनांक १७ ऑगस्ट २००२, १ फेब्रुवारी २००६ व दिनांक ११ डिसेंबर २०१५ नुसार बेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांना तीन लाखाच्या आतील कामे विना-निविदा देणे आवश्यक आहे. हा शासन निर्णय शासनाच्या सर्व कार्यालयांना, निमशासकीय संस्था, महामंडळे यांना लागू आहे.

माळी म्हणाले, शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्ती तपासून सेवा सोसायट्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव काम वाटप समिती समोर सादर करण्यात येतात. त्यानुसार पात्र संस्थांना काम वाटप करण्यात येते, याची दखल सर्व कार्यालयांनी घ्यावी. यापुढे कार्यालयाकडील उपलब्ध कामे परस्पर न देता शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे सादर करावीत.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याविषयी जनजागृती करा

 महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे बोधचिन्ह व घोषवाक्य शासकीय विभागांनी आपल्या विभागातील/ जिल्ह्यातील शासकीय बैठका, परिषदा, मेळावे इत्यादी ठिकाणी प्रसिध्द करून जनतेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे उप सचिव आण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे. आपली सेवा आमचे कर्तव्य हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे घोषवाक्य आहे.

Web Title: Report work for unemployed service societies: S. Of Gardener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.