शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीचा अहवाल प्रदेशकडे पलूस-कडेगाव पोटनिवडणूक :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:14 IST

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याबाबतची माहिती भाजपने प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे. भाजप च्या वरिष्ठ नेत्यांची बैठक चार दिवसांत होणार असून, त्यामध्ये पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. याच मतदारसंघात (पूर्वीचा भिलवडी-वांगी) १९९६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा दाखला पृथ्वीराज देशमुख यांचे ...

ठळक मुद्देदेशमुख गट निवडणूक लढण्याच्या तयारीत; अंतिम निर्णय प्रदेश स्तरावरच ठरणार

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याबाबतची माहिती भाजपने प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक चार दिवसांत होणार असून, त्यामध्ये पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. याच मतदारसंघात (पूर्वीचा भिलवडी-वांगी) १९९६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा दाखला पृथ्वीराज देशमुख यांचे समर्थक देत आहेत. त्यावेळीही संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक पतंगराव कदम यांनी व त्यांच्या समर्थकांनी लढविली होती. त्यामुळे पतंगराव कदम यांच्या पश्चात पृथ्वीराज देशमुख यांनीही तशीच भूमिका घ्यावी, असे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे मत आहे. मतदारसंघातील आताची माहिती प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतानाच अंतिम निर्णय भाजपच्या प्रदेश स्तरावरील नेतेमंडळी घेणार आहेत.मे महिन्यातील पहिल्याच आठवड्यात याबाबत भाजपचा निर्णय स्पष्ट होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देशमुख, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे व अन्य मोजक्याच पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत होणार आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मतही प्रदेशकडे मांडण्यात आले आहे. त्यामुळे प्रदेश स्तरावर पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीबाबत कोणता निर्णय होणार, याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसच्यावतीने पतंगराव कदम यांचे पुत्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे, मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत निर्णय घेतलेला नाही.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर लागलेली तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले नव्हते. भाजपचा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीबाबत तातडीने निर्णय झाला होता, मात्र पलूस-कडेगावमध्ये भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळीच आहे. या निवडणुकीला जुना इतिहास चिकटल्याने पोटनिवडणूक लढविण्याबाबतचा विचार देशमुख गट करीत आहे.आठवडाभरात बैठकभाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे म्हणाले, भाजपच्या प्रदेश स्तरावरच पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीचा निर्णय होईल. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासाठीची बैठक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण