जिल्ह्याला पुन्हा वळवाचा दणका
By Admin | Updated: April 12, 2015 00:46 IST2015-04-12T00:45:09+5:302015-04-12T00:46:54+5:30
वादळी वाऱ्यासह पाऊस : सांगली-मिरजेसह शिराळा, वाळवा, कडेगावात जोरदार हजेरी

जिल्ह्याला पुन्हा वळवाचा दणका
सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्याला वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने शनिवारी झोडपून काढले. शिराळा, वाळवा व कडेगाव तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. खानापूर, आटपाडी तालुक्यांत मात्र पावसाचा शिडकावा झाला. जोरदार वारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गहू, हळद, मका, आदी पिकांचे आणि कडब्याचे
नुकसान झाले.
गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस थांबून, थांबून पडत आहे. सांगली, मिरज परिसरात शनिवारी दुपारी अडीच ते साडेतीन दरम्यान मुसळधार पाऊस झाला. (पान १० वर) (आणखी वृत्त हॅलो २)
राज्यात चोवीस
तासांत १३ बळी
मुंबई : राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या चोवीस तासांत
१३ जणांचा बळी गेला असून, शुक्रवारी पाचजणांचा वीज पडून मृत्यू झाला होता़ तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहाजणांचा, तर अन्य घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़ यामध्ये बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, नगर आणि नंदूरबारमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे़